★ Silver Jubilee admissions open — flagship course at ₹15,000 (MRP ₹18,000).

All articles

इंग्रजी शिकायचं स्वप्न १ वर्षात पूर्ण? हा पहिला ब्लॉग वाचा आणि आजपासून सुरू करा — 365 Days English Challenge

By R. M. Meshram · 5 October 2026 · 5 min read

इंग्रजी शिकायचं स्वप्न १ वर्षात पूर्ण? हा पहिला ब्लॉग वाचा आणि आजपासून सुरू करा — 365 Days English ChallengeSpoken English

मित्रांनो, आपण सर्वांना माझा नमस्कार! मी माझ्या पहिल्या ब्लॉग ची सुरुवात एका छोट्याशा घटनेने करतो. काल संध्याकाळी विजेता स्पोकन इंग्लिश क्लासेस मधील माझे लेक्चर संपल्यानंतर मी बाहेर पडत होतो. समोरच माझा एक जुना विद्यार्थी, राहुल भेटला. खूप दिवसांनी दिसला होता. मी विचारलं, "काय राहुल, मजेत आहेस ना?"

तो म्हणाला, "सर, मजेत तर आहे. पण मनात एक गोष्ट खूप दिवसांपासून खटकतेय. मला इंग्रजी येत नाही. लोकांसमोर बोलायचं धाडस होत नाही. पण आता वय झालं, आता शिकून काय होणार?"

मी त्याला विचारलं, "रोज फक्त १५ मिनिटं देऊ शकतोस का?"

तो म्हणाला, "ते तर देऊ शकतो, पण १५ मिनिटांत काय होणार?"

मी हसलो आणि म्हणालो, "१५ मिनिटं रोज दिली तर ३६५ दिवसांनी तू इंग्रजी बोलताना दिसशील. पण ते तेव्हाच होईल, जेव्हा तू आजपासून सुरुवात करशील."

मित्रांनो, राहुलचा प्रश्न हा फक्त त्याचाच नाही. हा प्रश्न तुमचा आहे, माझा आहे, आणि शिक्रापूरसारख्या प्रत्येक गावातल्या माणसाचा आहे.

पण कदाचित तुम्हाला वाटत असेल:
“माझं वय झालं.”
“मी तर १० वी पास, मला काही जमणार नाही.”
“शेती/नोकरी/बिझनेस सांभाळून इंग्रजी शिकायला वेळ कुठं मिळतं का?”
“आधी खूप वेळा सुरू केलं, पण नाही जमलं.”
“व्याकरण समजतं, पण बोलताना अडखळतो.”

मित्रांनो, आज मी तुम्हाला एक वचन देतो:

जर तुम्ही पुढील ३६५ दिवसांत रोज फक्त १५ मिनिटं दिली, तर ३६५ दिवसांनी तुम्ही इंग्रजी बोलताना दिसाल. हा ब्लॉग तुमच्या वर्षभराच्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे.

हे जादू नाही. ही एक सिस्टम आहे.

इंग्रजी का जमत नाही? याचं खरं कारण म्हणजे-

बहुतेक लोक इंग्रजी शिकतात. पण बोलत नाहीत.

कारण? ते -

  1. फक्त व्याकरण शिकतात, बोलत नाहीत.
  2. एकदा शिकतात, रिव्हिजन करत नाहीत.
  3. चुका होतील म्हणून लाजतात.
  4. योग्य शिक्षक आणि योग्य सिस्टम नसते.
  5. रोज १५ मिनिटंही देत नाहीत.

मित्रांनो, लक्षात ठेवा - "इंग्रजी ही हुशार लोकांची भाषा नाही. ती सराव करणार्‍यांची भाषा आहे."

आणि म्हणूनच आम्ही सुरू करत आहोत —

३६५ Days English Challenge

Vijeta Spoken English ची ही वर्षभराची सीरिज — एकूण १८२ ब्लॉग, १२ महिने, ४ टप्पे.

सुरुवात हळू होईल. कारण टिकवणं महत्त्वाचं आहे.

📅 आता आपण ब्लॉग सीरिजचं वेळापत्रक पाहूया — हळूहळू वाढ

टप्पा			         महिने		आठवड्याला ब्लॉग			एकूण ब्लॉग

🟢 पाया ( Foundation ) महिने १-३ २ ब्लॉग २६
🟡 इमारत ( Building ) महिने ४-६ ३ ब्लॉग ३९
🟠 प्रगती ( Fluency ) महिने ७-९ ४ ब्लॉग ५२
🔴 प्रभुत्व ( Mastery ) महिने १०-१२ ५ ब्लॉग ६५

आपण एकूण १२ महिन्यात १८२ ब्लॉग अभ्यासणार आहोत.

का हळूहळू वाढ होईल?

कारण तुम्हीही तसंच शिकायचं आहे. आधी सवय, नंतर वेग.
आधी २ ब्लॉग, नंतर ५ ब्लॉग. तुमच्यासोबत आम्हीही वाढत जाऊ.

पहिल्या ३ महिन्यांत काय येईल?

टप्पा १ — पाया (आठवड्याला २ ब्लॉग):

महिना १: सुरुवात — ३-सेकंड नियम, आरशासमोर बोलणं, रोज ५ वाक्यं, Basic Greetings, स्वतःची ओळख

महिना २: रोजचा वापर — १० उपयुक्त वाक्यं, Present/Past/Future Tense, बाजारातील इंग्रजी, Time आणि Date

महिना ३: प्रश्न आणि संवाद — Wh- Questions, Small Talk, फोनवर इंग्रजी, Emotions, विनंती आणि आभार

आणि प्रत्येक ३ महिन्यांनी — Review ब्लॉग. प्रगती दिसेल, प्रेरणा टिकेल.

Vijeta चा ३६५ दिवसांचा फॉर्म्युला

आमची पद्धत सोपी आहे:

१. रोज १५ मिनिटं: जास्त नको. फक्त १५ मिनिटं. पण रोज.

२. ५ वाक्यं: रोज फक्त ५ इंग्रजी वाक्यं. तीच वाक्यं पुन्हा पुन्हा.

३. १ ऑडिओ: ऐकायचं. ऐकत ऐकत बोलायचं.

४. १ लेखन: ५ वाक्यं लिहायची. हाताला सवय.

५. १ बोलणं: आरशासमोर, मोबाईलवर, मित्रासमोर — बोलायचंच.

६. Sleep & Learn (झोपा आणि शिका) - यासाठी माझे 'स्लीप अँड लर्न इंग्लिश' पुस्तक वाचा.

मेंदू झोपेतही शिकतो.

७. विजेताचा 21-21-21 Formula: २१ दिवस, रोज २१ मिनिटं, २१ वेळा पुनरावृत्ती. मेंदू ते वाक्य आपोआप बोलायला लागतो.

८. Vijeta AI: २४ तास तुमचा वैयक्तिक शिक्षक. चुका सांगेल, सराव करवेल.

९. आर. एम. मेश्राम सर:

१. संमोहनातून इंग्रजी बोलायला शिका!
२. पैसा पैसा पैसा
३. अभ्यासाच्या वैज्ञानिक पद्धती व परीक्षेची तयारी
४. गुरु
५. स्लीप अँड लर्न इंग्लिश
६. द सिक्रेट ऑफ टॉपर्स

या सहा पुस्तकांचे लेखक व हिप्नॉटिक कोच. २६ वर्षांचा अनुभव, १०,०००+ विद्यार्थी प्रशिक्षित.

आजचा Day 1 टास्क — हा ब्लॉग वाचल्यावर लगेच सुरुवात करा.

खालील ५ वाक्यं मोठ्याने ५ वेळा बोला:

  1. My name is __.
  2. I am learning English.
  3. I can speak English.
  4. I will practice daily.
  5. I am proud of myself.

आता ही वाक्यं लिहा आणि रेकॉर्ड करा.
हेच तुमचं पहिलं पाऊल.

मित्रांनो, ही एक अशी सीरिज आहे जी शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, विद्यार्थी — सगळ्यांसाठी आहे.

आणि जेव्हा एखादा माणूस ठरवतो की “मी ३६५ दिवस इंग्रजी शिकणार”, तेव्हा तो एकटा शिकत नाही. तो संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलतो.

तुमच्यासाठी ३ गोष्टी: या ३ गोष्टी कधीच विसरू नका. १८२ ब्लॉग पर्यंत हा नियम पाळा.

१. हा ब्लॉग WhatsApp वर ५ मित्रांना पाठवा.
ज्यांना इंग्रजी शिकायची इच्छा आहे, पण धैर्य नाही — त्यांच्यासाठी.

२. खाली कमेंट करा:
“I am starting my English journey today.”

३. आजच विजेता स्पोकन इंग्लिशला भेट द्या.
पत्ता: STC, जीओ पेट्रोल पंपाजवळ, शिक्रापूर.
फोन: 8055513932
वेबसाइट: vijetaspokenenglish.in (https://vijetaspokenenglish.in/)

🎁 विशेष ऑफर — Silver Jubilee Course

फ्लॅगशिप कोर्स - ₹ १५,००० ( MRP ₹ १८,००० ).
आजच भेट द्या आणि ₹ १,००० डिस्काउंट मिळवा.

📢 पुढचा ब्लॉग कधी येईल?

Blog 2 : इंग्रजी बोलताना अडखळतात? हा “३-सेकंड नियम” वापरा.

🗓️ कधी येईल?

सोमवार — सायं. ७.३० वाजता
गुरुवार — सायं. ७.३० वाजता

दर आठवड्याला २ ब्लॉग. आणि हे पहिले ३ महिने सुरू राहील.

ठरलेल्या वेळी परत या — आणि Blog 2 वाचा.

ही सीरिज पूर्ण वर्षभर चालेल — एकूण १८२ ब्लॉग.
तुम्ही फक्त वही आणि पेन घेऊन सोबत राहा.

“शेतात पीक येतं, पण इंग्रजीत आत्मविश्वास येतो. दोन्ही पिकवा.”

— विजेता स्पोकन इंग्लिश क्लासेस, शिक्रापूर.

English Summary:

Want to speak English ? Join the 365 Days English Challenge by Vijeta Spoken English. Just 15 minutes daily. 182 blogs, 12 months. Start your Day 1 task today.

Next Blog : The "3-Second Rule" — Every Monday & Thursday at 7:30 PM.
📍 Vijeta Spoken English Classes, Shikrapur.
📞 8055513932
🌐 vijetaspokenenglish.in

Practise what you just learned.

Vijeta AI will chat with you and gently correct your English — free, 24×7.

Visit Our Institute